घनसावंगी: कुंभार पिंपळगाव परिसरात खरीप लागवडीला सुरुवात;शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
जालना जिल्ह्यातील कुंभार पिंपळगाव परिसरात खरीप हंगामाच्या लागवडीची लगबग सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतजमिनीची मशागत पूर्ण करून कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांच्या लागवडीस प्रारंभ केला आहे. मात्र अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत असून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला असला तरी जिल्ह्यात सर्वत्र अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवडीची तयारी केली असली तरी अनेक ठिकाणी लागवडीचे काम सावधगिरीने