नागपूर शहर: नागपुरात भरधाव कार घुसली दुकानात,सुदैवाने जीवितहानी टळली
नागपूरमधील वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या वासुदेव नगर परिसरात भीषण अपघाताची घटना घडली. एक भरधाव कार अनियंत्रित होऊन थेट एका दुकानात घुसल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, धडकेमुळे दुकानाचे बांधकाम काही प्रमाणात कोसळले असून दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.