सेनगाव: शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल माजी आमदार गोरेगांवकर यांचा गोरेगांव या ठिकाणी होणार भव्य सत्कार
हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगांवकर यांचा गोरेगांव या ठिकाणी दिनांक 19 ऑक्टोबर रोजी भव्य सत्कार आयोजित करण्यात येणार आहे. नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगांवकर यांनी मुंबई या ठिकाणी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला असून त्या अनुषंगाने त्यांचा गोरेगांव या ठिकाणी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख अमोल खिल्लारी यांच्याकडून मिळाली.