नागपूर शहर: पुष्पगुच्छ नको, शैक्षणिक साहित्य द्या! गणेश चार्लेवार यांचा स्तुत्य उपक्रम
नागपूर महानगरपालिकेचे शिवसेना (शिंदे गट) नवनियुक्त गटनेते गणेश चार्लेवार यांनी आपल्या पदग्रहण सोहळ्याला सामाजिक कार्याची जोड देत एक नवा आदर्श घालून दिला आहे. 'फुलांचे गुच्छ नकोत, फक्त पुस्तके व शैक्षणिक साहित्य द्या' या त्यांच्या आवाहनाला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोहळ्यानिमित्त हार-तुरे स्वीकारण्याऐवजी पेन, पेन्सिल, वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्य जमा करण्यात आले.जमा झालेले सर्व साहित्य चार्लेवार यांच्या हस्ते गरजू व आ