नागपूर शहर: नागपूर महानगरपालिकेवर शिवसेना चा धडक मोर्चा; जिग्मा बायोमिनिंगमधील 'हुकूमशाही' विरोधात रणशिंग
नागपूर महानगरपालिकेच्या भांडेवाडी येथील जिग्मा बायोमिनिंग प्लांटमधील कामगारांच्या प्रश्नांवरून आता राजकीय वातावरण तापले आहे. कामगारांवर होणारी गुंडागर्दी, कमी वेतन आणि असुरक्षित कामाच्या ठिकाणांचा निषेध करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महानगरपालिकेवर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला.