नागपूर शहर: : नागपुरात 'राज्यमाता गोमाता' संवाद यात्रेचा भव्य समारोप
गोसंवर्धन आणि भारतीय संस्कृतीत गोमातेचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने आयोजित 'राज्यमाता गोमाता संवाद यात्रे'चा समारोप आज नागपुरातील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. समारंभादरम्यान मुख्यमंत्र्यांनी गोमातेची विशेष पूजा करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.