गेवराई: बंजारा समाजाला एसटीचे आरक्षण मिळत नसल्याने पांगरी येथे व्यक्तीने व्हिडीओ बनवून गळफास घेऊन केली आत्महत्या
Georai, Beed | Oct 28, 2025 बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळत नसल्याच्या निषेधार्थ गेवराई तालुक्यातील पांगरी येथील प्रविण जाधव या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ तयार केला आणि मी आत्महत्या करत असल्याचे व्यक्त केले याला संपूर्ण शासन जबाबदार राहील असे देखील त्या व्यक्तीने व्यक्त केले आहे.