भोकरदन: सिल्लोड- भोकरदन- जाफराबाद सिमेंट मार्गाचे काम निष्कृष्ट दर्जाचे-प्रा.अंकुश जाधव,छत्रपती शिवाजी महाराज चौकात आरोप
आज दिनांक 16 जुलै 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रा. अंकुश जाधव यांनी आरोप केले आहे की, सिल्लोड,भोकरदन, जाफराबाद या सिमेंट मार्गावर गड्डे, तडे पडले असून या मार्गाचे काम संबंधित गुत्तेदाराने निष्कृष्ट दर्जाचे केले आहे, त्या मुळे रोज अपघात होत आहे, एक परिवार चा काल दुचाकी अपघात झाला मात्र थोडक्यात हा परिवार वाचला, त्या मुळे या गुत्तेदारावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.