मिरज: खटाव येथील पाटील मळा येथे एकाचा विद्युत धक्क्याने मृत्यू
Miraj, Sangli | Aug 20, 2025 खटाव (ता. मिरज) येथील मंगसुळी रोडवरील वडर वस्ती पाटील मळा येथे राहणाऱ्या श्री. हणमंत पाटील यांचा एकुलता एक मुलगा प्रविण पाटील (वय २७) याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. सकाळच्या सुमारास पावसामुळे घरासमोरील पाण्याची टाकी भरून घेण्यासाठी प्रविण विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी गेला होता. यावेळी मोटारीजवळ असलेल्या पेटीत अचानक विजेचा शॉक बसल्याने तो जागीच गंभीर जखमी झाला. घरातील मंडळींनी तातडीने त्याला मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविले.