मानगाव: मुंबई-गोवाअपूर्ण महामार्गाने घेतले 15 वर्षात 1285 जणांचे बळी
रखडलेले चौपदरीकरण, धोकादायक वळणे, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, महामार्गाच्या क्षमतेपेक्षा सुरू असलेली जास्त वाहतूक, भरधाव वाहने, यामुळे मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या महामार्गावर 32 अपघात प्रवण क्षेत्र आढळून आले आहेत. महामार्गावर होत असलेले अपघात व त्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या विचारात घेतली असता, अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे असल्याचे दिसून येते. या महामार्गावर रायगड जिल्हा हद्दीत मागील 15 वर्षात 5 हजार 221 अपघात झाले असून, त्यामध्या 1 हजार 285 जणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.