हवेली: पुणे नगर महामार्गावर पेरणे येथे कंपनीची खाजगी बसने अचानक पेट घेतला
Haveli, Pune | Oct 30, 2025 पुणे नगर महामार्गावर पेरणे येथे खाजगी कंपनीच्या कामगार वाहतूक करणाऱ्या बसने अचानक भेट घेतल्याची घटना घडली. यावेळी बस मध्ये महिला कामगार व पुरुष कामगार होते. गाडीमधून अचानक धुर येऊ लागल्याने ते सर्वजण बसमधून बाहेर पडले. त्यानंतर बसने पेट घेतला. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.