औंढा नागनाथ: साळणा पाटीजवळ भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी;कार चालकावर औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावर साळणा पाटीजवळ भरधाव कार क्रमांक एमएच 08 झेड 8852 या कारचालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव व वेगात चालून दुचाकी क्रमांक एमएच 38 यु 1474 जवळ उभे असलेले राजू उर्फ राजेश उत्तम खिल्लारे यांना जोराची धडक देऊन त्यांना गंभीर जखमी केले व दुचाकीचे 25 हजाराचे नुकसान केल्याची घटना घडली होती याप्रकरणी फिर्यादी राजू उर्फ राजेश खिल्लारे यांच्या फिर्यादीवरून कारचालकावर दिनांक 2 डिसेंबर मंगळवार रोजी रात्री अकरा वाजता औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला