औंढा नागनाथ: चोंडी काठोडा पाटी जवळ भरधाव कारची दुचाकीला धडक पती-पत्नी ठार, कारचालकावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
औंढा नागनाथ ते वसमत जाणाऱ्या मार्गावर चोंडी काठोडा पाटी जवळ वसमत कडून येणारी भरधाव कार क्रमांक एमएच १२ एनई ३८०३ या कारणे दुचाकी क्रमांक एमएच २६ झेड २००७ च्या दुचाकीस जोराची धडक दिल्याने दुचाकी वरील शेख एजाज व त्यांच्या पत्नी शेख नूरजहाँ राहणार बरकतपुरा तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड यांचा मृत्यू झाला व मुलगी अनाबिया वय २ वर्ष गंभीर जखमी केल्याने शेख इल्यास यांच्या फिर्यादीवरून कारचालकावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिनांक १३ ऑक्टोबर सोमवार रोजी रात्री नऊ वाजे दरम्यान गुन्हा दाखल केला.