नागपूर शहर: पारडीतील लूटमारीचा छडा; गुन्हे शाखा युनिट 5 ने दोघांना ठोकल्या बेड्या: विनायक गोल्हे, पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी 16 मे ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार,पारडी परिसरात रॅपिडो रायडरला लुटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात क्राईम ब्रांच युनिट ५ आणि सायबर टीमला यश आले आहे. अवघ्या चार दिवसांत पोलिसांनी ही कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि मोबाईल जप्त केला आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी दिली आहे.