नाशिक: सातपूर दरोडा प्रकरण उघडकीस; तिघा चाकूधारी आरोपींना अटक
Nashik, Nashik | Oct 17, 2025 त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी रिक्षाने जात असताना प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघा भामट्यांना गुन्हे शाखा युनिट-१ नाशिकने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून सुमारे १ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दिनांक २८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सातपूरनंतर रिक्षा चालक व दोघांनी फिर्यादीकडून मोबाईल, रोख रक्कम व सोन्याची बाळी असा ऐवज लुटला होता.