जालना: गणेशपूरचा रस्ता चिखलात; विद्यार्थ्यांचे भविष्यही अडचणीत!; उद्घाटनाच्या पाट्या लागल्या, पण दोन किलोमीटरचा रस्ता गायब
Jalna, Jalna | Jul 9, 2026 जाफ्राबाद तालुक्यातील मौजे गणेशपूर ते मुख्य फाट्यापर्यंतच्या सुमारे दोन किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली असून, पावसामुळे संपूर्ण मार्ग चिखलमय झाला आहे. या रस्त्यावरून साधे चालणेही कठीण झाले असून, ग्रामस्थांसह शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. गुरुवार दि. 9 जुलै 2026 रोजी स. 9 वा. मिळालेल्या माहितीनुसार रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गावात सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनेही येण्यास तयार नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.