: शहरातील फळ गल्लीतील दुकानासमोरुन मनिषा सुनिल बोरसे (वय ४१, रा. सम्राट कॉलनी) यांची दि. २ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास (एमएच १९, सीजी ३५०१) क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना उघडकीस आल्यानंतर महिलेने सर्वत्र शोध घेतला, मात्र तरी देखील दुचाकी मिळून न आल्याने मनिषा बोरसे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ योगेश पाटील हे करीत आहे.