नागपूर शहर: नागपूर जलमय: ५२ कोटींचा खर्च पाण्यात; माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोल्हारकर यांचा सवाल
[
शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले असून नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. दरवर्षी नालेसफाईच्या नावाखाली मोठा खर्च केला जात असतानाही ही पूरस्थिती निर्माण झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, २०२२ ते २०२६ या चार वर्षांत नालेसफाई व नदी स्वच्छतेवर तब्बल ५२ कोटी १७ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. एवढा मोठा निधी खर्च होऊनही शहराची ही दुर्दशा का झाली, असा सवाल केला आहे.