कळंब : शेतातून घरी परतत असलेल्या तिघांना विनानंबरच्या दुचाकीने दिलेल्या धडकेत जखमी झाल्याची घटना कळंब–बाभूळगाव रोडवर घडली. याप्रकरणी आदेश संतोष ठाकरे यांनी कळंब पोलिसात तक्रार दाखल केली आहे. चेतन व भारत या दोन भावांसह घरी जात असताना गजानन गाडेकर याने चालवलेल्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी आरोपी चालकावर गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.