रावेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी सोमवारी १२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता पार पडलेली निवडणूक प्रक्रिया अत्यंत नाट्यमय आणि ओढताण वळणाने गाजली. सभेपूर्वीच दोन राजकीय गटांमध्ये झालेल्या जोरदार वादावादीत एका नगरसेवकाचे कपडे फाटल्याची धक्कादायक घटना घडली. या अभूतपूर्व गदारोळानंतर झालेल्या मतदानात राजकीय गणिते पूर्णपणे उलटली.