नागपूर शहर: CLBP' कंपनीचा कोट्यवधींचा घोटाळा उघड; दोन जणांना अटक: पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल
पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी 18 जूनला दुपारी 05:30 यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर: नागपूर आर्थिक गुन्हे शाखेने 'CLBP सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीकडून सुरू असलेल्या मोठ्या आर्थिक फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. 'फ्री कॉइन' आणि 'मर्चेंट कॉइन'च्या नावाखाली गुंतवणूकदारांना १०० दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून आरोपींनी १५ कोटी ५८ लाखांची फसवणूक केली होती.या प्रकरणी मिहुल दीक्षित आणि कंपनीचा मालक राकेश गर्ग यांना अटक करण्यात आली आहे.