नागपूर शहर: वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ३ जण अटकेत
18 जून ला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कोराडीतील बोखारा येथून मारुती ओमनी कार चोरी करणाऱ्या टोळीला नागपूर गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने जेरबंद केले. अब्दुल रब, राहील शेख आणि आबिद अहमद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीची ओमनी कार आणि गुन्ह्यात वापरलेली पल्सर असा एकूण १.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फरार साथीदारांचा शोध सुरू असून,