महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मीरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांचा वाद आता चव्हाट्यावर येताना दिसून येत आहे. आज दिनांक 4 जानेवारी रोजी दुपारी 3 च्या सुमारास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नाव न घेता आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर टीका केली आहे. तसेच चोरांपासून सावधान असं म्हणत त्यांनी मीरा-भाईंदरच्या जनतेला आवाहन केलं आहे.