लातूर: लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा द्या!,शिंदे गट शिवसेनेचं लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Latur, Latur | Oct 8, 2025 लातूर -अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर झालेले पीक नुकसान लक्षात घेता, शेतकऱ्यांना तात्काळ आणि सरसकट पीकविमा मिळावा यासाठी आज दिनांक आठ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान शिंदे गट शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनप्रसंगी शिवसेना राज्य समन्वयक तसेच आमदार डॉ. राजन साळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.