नागपूर शहर: नागपूर हादरले! अथर्व नानोरे हत्याकांडाचा उलगडा; ओळखीच्याच मित्राने रचला होता मृत्यूचा सापळा, ३ आरोपींना अटक
हनुमान जयंतीच्या दिवशी बेपत्ता झालेल्या अथर्व नानोरे या तरुणाचा अत्यंत निर्घृणपणे खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नागपूर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत वेगाने चक्रे फिरवत तीन नराधम आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अथर्वच्या परिचयातील मित्रानेच या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतून हनुमान जयंतीच्या दिवशी अथर्व नानोरे चे अपहरण करण्यात आले.