गगनबावडा येथे गोवा बनावटीचा मद्यसाठा वाहनासह पकडला; पोलिसांकडून दोघांना अटक
गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या विजय उर्फ दिग्विजय दिलीप पांढरपट्टे, अजित विश्वनाथ भंडारे या दोघांना गगनबावडा पोलिसांनी ताब्यात घेतलं. कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील गगनबावडा चौक येथे केलेल्या कारवाईत चार लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.अशी माहिती आज शुक्रवार नऊ मे सायंकाळी साडेचार वाजता गगनबावडा पोलिसांकडून मिळाली आहे.