सातारा: सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड
Satara, Satara | Sep 14, 2025 सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेकांची नावे होती. मात्र, अखेर पानीपतकार विश्वास पाटील यांच्या नावाची वर्णी लागली आहे. साताऱ्यात हे संमेलन होणार असून अध्यक्ष निवडण्यासाठी पुण्यातील साहित्य परिषदेत रविवारी सकाळी अकरा वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. साहित्य महामंडळाच्या वेगवेगळ्या शाखांकडून वेगवेगळ्या साहित्यिकांची नावे अध्यक्षपदासाठी सुचवण्यात आली होती.