समुद्रपूर: जाम येथिल शिवनेरी हॉटेलसमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत आढळून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू; घटनेची समुद्रपूर पोलिसांत नोंद
समदपूर:तालुक्यातील जाम येतील नागपूर ते जाम कडे येणारा हायवे रोड येथील शिवनेरी हॉटेल समोर दिनांक ८ ऑगस्टला पोलिस प्रेटोलिंग करीत असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत अज्ञान व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे आढळून आल्याची माहिती आज शनिवारी १२ वाजता पोलिसांकडून प्राप्त झाली असून या व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.मृत्यक अज्ञात व्यक्तीची ओळख पटली नसुन त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय समुद्रपूर येथील ऋवगृहात ठेवण्यात आला आहे.