समुद्रपूर: जाम येथिल कृषि विभागाच्या खाली जागेची वैद्यकीय महाविद्यालयासाठी आयुर्विज्ञान विभागाच्या टीमकडून पाहणी
हिंगणघाट विधानसभा श्रेत्रात मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाम येथे कृषी विभागाच्या खाली जागेवर करण्याची मागणी करण्यात आली होती.यावर आज जिल्हाधिकारी राहुलजी कर्डीले यांच्यासह आयुर्विज्ञान समितीची टिमने जाम येथे पोहचून जागेची पाहणी केली आमदार समिरभाऊ कुणावार यांनी बुधवारी मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटच्या जागे संदर्भात उद्भवलेल्या अडचणींवर तोडगा काढण्याची मागणी केली होती जाम येथे सुध्दा टिमने जागेची पाहणी केली.