दरवर्षी प्रमाणे यंदाही नेत्रहिन, दिव्यांग आणि मतिमंद यांच्या सोबत दिवाळी साजरी करणार आहे. जनतेच्या हक्काचे एकमेव ठिकाण गंगा सावित्री येथे आज २१ ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता वाजता दिवाळी साजरी करणार आहे. मागील कित्येक वर्षांपासून रवी राणा सर्वात आधी नेत्रहिन, दिव्यांग आणि मतिमंद यांच्या सोबत दिवाळी साजरी करतात. हे संपूर्ण जिल्ह्यात माहीत आहे. फक्त कुटुंबा पर्यंत मर्यादित कोणताही सण आणि उत्सव रवी राणा यांनी साजरा केला नाही. हे येथे विशेष सांगण्यासारखे आहे.