नागपूर शहर: नागपुरात चेन स्नॅचिंगचा गुन्हा उघड; गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक
14 एप्रिल ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मी नगर भागात ७७ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी पळवणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट १ ने अटक केली आहे. सचिन नत्थू शाहू असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला बुटीबोरी येथून ताब्यात घेण्यात आले.४ एप्रिल रोजी अनुपमा शिरास मॉर्निंग वॉकला गेल्या असताना ही चोरी झाली होती. पोलिसांनी आरोपीकडून १० ग्रॅम सोने आणि गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिव्हा असा एकूण १ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. तांत्रिक तपास आणि