नागपूर शहर: 'डाऊनटाऊन' हुक्का पार्लरवर सलग तिसऱ्यांदा छापा; ११ जणांवर गुन्हा दाखल : संजय सिंह, पोलीस निरीक्षक
सदर ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सिंह यांनी 15 मे ला दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरात फोफावत चाललेल्या हुक्का पार्लर संस्कृतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सदर पोलिसांनी माउंट रोडवरील 'डाऊनटाऊन' हुक्का पार्लरवर पुन्हा एकदा मोठी कारवाई केली. विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांतील या पार्लरवरील हा तिसरा छापा आहे.या कारवाईदरम्यान अनेक ग्राहक हुक्का पिताना रंगेहात सापडले. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक संजय सिंह यांनी दिली आहे.