नागपूर शहर: महाल दंगल प्रकरण: मुख्य सूत्रधार फहीम खानला पुन्हा अटक
गेल्या वर्षी मार्च महिन्यात महाल परिसरात झालेल्या भीषण दंगल प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खान याला तहसील पोलिसांनी अटक केली आहे. फहीम खान हा 'मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी'चा पदाधिकारी असून एमआयएम नगरसेविका अलिषा खान यांचा पती आहे. १७ मार्च रोजी महाल भागात दंगल उसळली होती, ज्यात महिला पोलिसांचा विनयभंग आणि मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली होती.फहीम खानवर विविध पोलीस ठाण्यात एकूण सहा गुन्हे दाखल आहेत.