जागतिक स्तरावर तरुणांच्या कौशल्यांना वाव देणाऱ्या आगामी 'जागतिक कौशल्य स्पर्धा 2026' साठी आयोजित करण्यात आलेली विभागीय पात्रता फेरी आज 24 डिसेंबर बुधवार रोजी अत्यंत उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विभागातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन केले. या स्पर्धेच्या माध्यमातून अमरावती विभागातील प्रतिभावान युवक-युवतींना आपली कौशल्ये जागतिक स्तरावर सिद्ध करण्याची आणि अमरावती विभागाचे नाव उंचावण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे...