पनवेल: पनवेल महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनादिवाळी निमित्त ३२ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहिर, विविध विभागांतर्गत १३२६ कर्मचाऱ्यांना लाभ
Panvel, Raigad | Oct 16, 2025 पनवेल मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्ताने आयुक्त मंगेश चितळे यांनी आज गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास आर्थिक वर्ष २०२४-२५ या वर्षाकरिता महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांना ३२ हजार रूपये तसेच प्राथमिक शिक्षकांना ,एनयुएलएम व पीएमएवाय अधिकारी यांना रूपये १० हजार, परिश्रमिक अधिकारी, एनयुएचएम यांना ७ हजार व आशा वर्कर व गट प्रर्वतक यांना ७ हजार सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. या सानुग्रह अनुदानांतर्गत प्रतिनियुक्तीवरील ५ अधिकारी, आस्थापनेवरील अधिकारी व कमर्चारी ८२५, प्राथमिक शिक्षक ६८, एनयुएलएम अधिकारी २, एनयुएचएम अधिकारी 2, परिश्रमिक अधिकारी १७, एनयुएचएम अधिकारी २०४, कर्मचारी आणि आशा वर्कर, गटप्रवर्तक अशा मिळून २०४ एकूण १ हजार ३२६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.