नागपूर शहर: गोळीबार चौकातील बिर्याणी सेंटरला भीषण आग; ४ लाखांचे नुकसान, जीवितहानी टळली
नागपूर येथील गोळीबार चौकातील 'फ्रेंड्स बिर्याणी फ्राय कॉर्नर'ला आज सकाळी भीषण आग लागली. या अपघातात दुकानातील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.माहिती मिळताच गंजिपेठ आणि सुजाता नगर अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांनी अवघ्या ५ मिनिटांत घटनास्थळी धाव घेत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.