नागपूर शहर: नागपुरात दोन शेजाऱ्यांमध्ये रक्ताळलेला संघर्ष; दोन्ही बाजूंच्या लोकांवर गुन्हा दाखल: अनिल ताकसांडे वरिष्ठ पोलीस निरीक्ष
जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी 28 मे ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दोन शेजाऱ्यांमध्ये घरगुती वादातून भीषण हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या हिंसक चकमकीत झाले असून, दोन्ही कुटुंबांनी एकमेकांवर लाठ्या, लोहेरी रॉड आणि विटांनी जीवघेणा हल्ला केला. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी दिली आहे