तुमसर: मिटेवानी येथे पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या ४ आरोपीविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल
तुमसर तालुक्यातील मिटेवानी येथे दि. 21 सप्टेंबर रोज रविवारला रात्री 10 वा.च्या सुमारास तुमसर पोलीस ठाण्याचे पोलीस हवा. राकेश पटले व त्याच्या सहकार्याला चार आरोपींनी बेदम मारहाण करून जखमी केले. यावेळी जखमींचा उपचार शासकीय उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे सुरू आहे. पोलिसांनी 4 आरोपींपैकी 2 आरोपींना अटक केल्याची माहिती मिळाली असून घटनेतील चारही आरोपीविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी आरोपींची नावे तुमसर पोलीस सूत्रानुसार कळाले नाही.