पाचोरा: लोहारासह परिसरातून जामनेर तालुक्यातील प्रति पंढरपूर संबोधले जाणारे शेंदुर्णी येथे दिंड्या रवाना,
पाचोरा तालुक्यातील लोहारासह परिसरातून प्रति जामनेर तालुक्यातील प्रति पंढरपूर संबोधले जाणारे गाव शेंदुर्णी येथे आषाढी एकादशीनिमित्त विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी पायी दिंडीत वारकरी संप्रदायातील टाळकरी, माळकरी ,तरुण ,जेष्ठ, महिला उत्साहात मोठ्या संख्येने जातात या दिंड्यांचे लोहारा येथून आज दिनांक 6 जुलै 2025 रोजी सकाळी 9 वाजता मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले होते, आषाढी एकादशी निमित्त मोठ्या संख्येने भाविक या दिंड्यात सहभागी होऊन दर्शनासाठी निघालेले पहावयास मिळाले होते,