घनसावंगी: पिंपरखेड गावच्या कु. गायत्री आरडेची महाराष्ट्र पोलीस दलात निवड
पिंपरखेड गावच्या कु. गायत्री आरडेची महाराष्ट्र पोलीस दलात निवड आज दिनांक 7 गुरुवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बु. येथील कु. गायत्री नामदेव आरडे हिने मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस दलात यश संपादन करत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिची मीरा भाईंदर (मुंबई) येथे पोलीस पदावर निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल आज पिंपरखेड बु. येथील ग्रामपंचायत कार्यालयात कु. गायत्री आरडे हिचा सत्कार समारंभ आय