नागपूर शहर: फेसबुक मैत्रीतून फसवणूक; लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार: बाबुराव राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी 10 मे ला दुपारी 4:30 वाजता दिलेल्या माहितीनुसार फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिली आहे.