श्रीरामपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीचे उंदीरगाव येथील संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे यांची उंदीरगाव येथे वैजापूर रोडला शेती आहे. दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्या गोठ्यातील गाभण शेळी बांधावर चरत असताना बिबट्याने हल्ला करून तिला त्यांच्या उसाच्या शेतात ओढून नेले. ही घटना त्यांच्या शेतीवरील मॅनेजर अनिल ताके यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ पाऊलबुद्धे यांचे चिरंजीव यांना माहिती दिली.