घनसावंगी: वाढत्या तापमानाचा बाजारपेठेवर परिणाम; तीर्थपुरीत शुकशुकाट..
वाढत्या तापमानाचा बाजारपेठेवर परिणाम; तीर्थपुरीत शुकशुकाट.. आज दिनांक 16 गुरुवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे वाढत्या उष्णतेमुळे बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमानाने चाळीशी पार केल्याने सकाळीच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे नागरिक दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळत असून, मार्केटमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. लग्नसराईमुळे संबंधित खरेदी काही प्रमाणात सुरू असली तरी इतर व्यवसायात ६० ते ७० टक्क्