राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक महासचिव आमदार - संजय खोडके यांच्या अध्यक्षतेखाली आज २६ ऑक्टोबर रविवार रोजी दुपारी साडे चार वाजता अमरावती जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करतांना आ.संजय खोडके यांनी सांगितले कि, अमरावती जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा मानणारा व राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उप-मुख्यमंत्री नामदार - अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविणारा मोठा जनाधार आहे...