ठाण्याच्या वर्तक नगर येथील रामचंद्र ठाकूर जलतरण तलावातील दोन जलतरणपटू रितू पवार आणि आनंद गाडेकर यांनी अवघ्या पहिल्याच प्रयत्नात 15 किमी खुल्या पाण्यातील जलतरण स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करत ठाण्याचा झेंडा उंचावला आहे. श्री दुर्गा माता कला क्रीडा व संस्कृती मंडळ विजयदुर्ग आणि महाराष्ट्र राज्य हौसी जलतरण संघटना यांच्या नियमावलीनुसार ही स्पर्धा पार पडली. अत्यंत चिकाटी, सहनशक्ती आणि शिस्तीच्या बळावर यशस्वीरित्या स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.