नागपूर शहर: नागपुरात एमडी ड्रग्जसह दोघांना अटक; सराईत गुन्हेगार फरार: गजानन गुल्हाने पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी आठ जून ला सायंकाळी सहा वाजता दिलेल्या माहितीनुसार भांडेवाडी परिसरातील संघर्ष नगर येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत ५२ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली आहे. याप्रकरणी विजय नंदलाल रहांगडाले आणि शहबाज फिरोज शहा या दोघांना अटक करण्यात आली असून, शेख सोहेल उर्फ भांजा हा मुख्य संशयित फरार आहे. त्याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी दिली आहे