नागपूर शहर: 'ड्रग्जच्या विरोधात शून्य सहनशीलता; अमली पदार्थांच्या मुळावर घाव घालणार' - देवेंद्र फडणवीस
"राज्यात अमली पदार्थांचा (ड्रग्ज) प्रसार रोखण्यासाठी सरकार अत्यंत गंभीर आहे आणि ड्रग्जच्या विरोधात 'झिरो टॉलरन्स' धोरण राबवले जात आहे," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. ड्रग्जच्या तस्करी आणि वापराबाबत माहिती देताना फडणवीस म्हणाले की, ड्रग्जच्या या जाळ्याला नष्ट करण्यासाठी सरकारकडून मोठे प्रयत्न सुरू आहेत. याचे मूळ शोधून कारवाई करण्यासाठी विविध पथके सक्रिय झाली आहे.