जामनेर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा उर्वरित 17 जागांचा निकाल दि. 21 डिसेंबर रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालात भाजपाचे 13 तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे 4 नगरसेवक निवडून आले असल्याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांनी केली.