नागपूर शहर: घरफोडी करणाऱ्या आरोपीना सहा तासात अटक : अरुण क्षीरसागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक
लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी 4 एप्रिल ला दुपारी 4 वाजून 45 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना लकडगंज पोलिसांनी अवघ्या सहा तासात अटक केली आहे. आरोपींकडून मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे.