म्हसला येथे एम.आर. लसीकरण शिबिर
3.3k views | Karanja, Washim | Sep 30, 2025 वाशिम (दि.२९,सप्टेंबर): कारंजा तालुक्यातील म्हसला येथील मदरसा या ठिकाणी MR लसीकरणाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला वै.अ. डॉ.रोशन राठोड, CHO डॉ.जेस्वानी, आरोग्य सहायक शेट्टीवार, आरोग्य सहायिका तिरपुडे, आरोग्य सेविका धाये, भालदंड,आरोग्य सेवक निखिल ठाकरे, शुभम पवार, फिरोज खान, वाहनचालक आतिक शेख तसेच म्हसला येथील आशा सेविका उपस्थित होत्या. एकूण 42 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. या प्रसंगी डॉ. राठोड यांनी विद्यार्थ्यांना एम.आर. लसीकरणाचे महत्व समजावून सांगितले.